राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?; आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

0 386

नवी मुंबई –  देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या परत एखदा वाढत आहे. नागरिकांकडून परत एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात येत आहे. केरळ आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणाने केंद्र सरकारने परत एकदा रात्री संचारबंदी (Night Curfew) करण्यात यावी अशी सूचना राज्यांना दिली आहे. (Night curfew in the state again ?; Possibility of decision in cabinet meeting today)  

आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Cabinet Meeting)  कोरोना रुग्णांची वाढती संख्या, राजकीय कार्यक्रमातील वाढती गर्दी, सणांबाबत नियमावली यासारख्या अनेक प्रश्नांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)  रात्रीची संचारबंदी लावण्यासंदर्भात संकेत दिले होते. त्यावरही आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
 
आज दुपारी १२. ३०च्या सुमारास राज्यात निर्बंध शिथील केल्यानंतर काही भागांत राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर, राज्यात येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्र असे अनेक सण आहेत. त्या सण समारंभात गर्दीमुळं करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणा बाबत नियमावली तयार करण्याच्या सूचना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला करोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना तीनच दिवसांपूर्वी केली होती. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नाइट कर्फ्यू लागणार असल्याची शक्यता आहे. त्याबाबत आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे.(Night curfew in the state again ?; Possibility of decision in cabinet meeting today)
Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: