DNA मराठी

कामाची बातमी! फोनचा पॅटर्न लॉक विसरला तर ‘या’ स्टेप्स फॉलो करून करा अनलॉक

0 277
News of work! If you forget the pattern lock of the phone, unlock it by following these steps

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –  देशातील बहुतेक नागरिकांकडे आज स्मार्ट फोन (Smart phone) आहे. या स्मार्ट फोनमुळे नागरिकांना आपल्या कामात मद्दत देखील होत आहे.  मग ते बँकिंगचे काम असो, घरबसल्या जेवणाची ऑर्डर असो किंवा खरेदी असो, कुणाला पैसे पाठवणे असो, कुणाशी बोलणे असो, सोशल मीडियाचा आनंद घ्या इ. ही सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून अगदी सहज होतात. यामुळे सध्या प्रत्येक जण आपल्या फोनला सुरक्षा म्हणून पॅटर्न किंवा पासवर्ड लॉक करून ठेवतात ज्यामुळे फोनचा मिस युज टाळता येतो. मात्र कधी कधी हाच पॅटर्न ( pattern lock ) किंवा पासवर्ड लॉक (Password lock) विसरल्यास अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो.

जर तुम्ही तुमच्या मोबाईलचे लॉक विसरला असाल तर तो अनलॉक करण्याचा सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या पद्धतीचा वापर करून तुम्ही सहज तुमचा फोन अनलॉक करू शकतात.

स्टेप १ – जर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा पॅटर्न किंवा पासवर्ड विसरला असाल आणि आता तुम्हाला हा फोन अनलॉक करायचा असेल, तर तुम्हाला आधी तुमचा मोबाईल बंद करावा लागेल आणि नंतर एक मिनिट थांबावे लागेल.

स्टेप २ – यानंतर आता मोबाईलचे पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकत्र दाबावे लागेल. मोबाइल रिकव्हरी मोडमध्ये येईपर्यंत ते दाबा आणि धरून ठेवा.

Related Posts
1 of 2,521

स्टेप ३ – जेव्हा तुमचा मोबाइल फोन रिकव्हरी मोडमध्ये असेल. त्यामुळे येथे आल्यानंतर तुम्हाला फॅक्टरी रिसेटचा पर्याय निवडावा लागेल.

स्टेप ४ – तुम्ही हा फॅक्टरी रीसेट पर्याय निवडताच, तुम्हाला वाइप कैशेचा पर्याय मिळेल. तुमचा सर्व डेटा साफ करण्यासाठी तुम्हाला ते निवडावे लागेल.

स्टेप ५ – काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल फोन पुन्हा चालू करावा लागेल.

या ट्रिकच्या मदतीने तुम्ही पासवर्ड, पॅटर्न किंवा पिनशिवाय तुमचा फोन अनलॉक करू शकाल. तथापि, लक्षात ठेवा की ही पद्धत वापरल्यानंतर, तुमच्या फोनमधील सर्व महत्वाचा डेटा हटविला जाईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: