मोठी बातमी ! एसटीत आणखी 400 खासगी चालकांची भरती

0 193
मुंबई – मागच्या दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) संपामुळे राज्य सरकारला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संपामुळे महामंडळाची कोंडी झाली आहे. मात्र अद्याप ही बहुतेक कर्मचारी कामावर परतले नाही. त्यामुळे आता एसटी पूर्ववत करण्यासाठी महामंडळाने सेवानिवृत्त चालक करारपद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. (Big news! Recruitment of 400 more private drivers in ST)
महामंडळाकडे ३८९ अर्ज आले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने आणखी ४०० कंत्राटी चालक खासगी कंपन्यांकडून ( private drivers) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  अद्यापही ६१ हजार कर्मचारी संपावर असून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही एसटीचा संप मिटलेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतरही प्रतिसाद कमीच आहे. एसटी महामंडळातील एकूण कर्मचारी संख्या ८७ हजार ७०५ आहे. यातील ६१ हजार ६७७ कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत. यामध्ये  चालक, वाहकांचीच संख्या अधिक आहे. २७ हजार ६८६ चालक आणि २२ हजार ८४६ वाहक अद्यापही कामावर नाहीत. तर उर्वरित अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यशाळा व अन्य कार्यालयीन कर्मचारी आहेत. फक्त २६ हजार २८ कर्मचारीच उपस्थित असून यामध्ये चालक, वाहकांची संख्या कमी आहे.

जिल्‍ह्यासाठी 700 कोटी रूपये निधी प्राप्‍त – पालकमंत्री हसन मुश्रीफ

Related Posts
1 of 1,640

दरम्यान, एसटीचे चालक, वाहक परतण्यास अनुत्सुक असल्याने महामंडळाने करारपद्धतीने सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. कंत्राटी पद्धतीने चालकही मनुष्यबळ पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून घेतले जात आहेत. सेवानिवृत्त ३८९ चालकांनी महामंडळाकडे अर्ज केले होते. त्यातील १३६ चालकच पात्र ठरले आहेत.

आतापर्यंतची कारवाई 

गुरुवारी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या- ४०१,  एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या- ३,१२३, एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या – ५,२७३, एकूण निलंबित कर्मचारी संख्या- ११,०२४ (Big news! Recruitment of 400 more private drivers in ST)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: