आपल्याच मामाला भाच्याने लावला लाखोंचा चुना,  घरातून केले 50 तोळे सोने लंपास 

0 348

नवी मुंबई –  एका अल्पवयीन मुलाने पुण्यात जाऊन हौसमौज करण्यासाठी आपल्या अन्य काही मित्रांच्या मदतीने आपल्याच मामाच्या घरातील तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सातही आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यातील सातही आरोपी अल्पवयीन आहे.

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि अल्पवयीन आरोपीचे मामा हे पुण्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्याचं घर बीडमध्ये आहे. मामाने बारावीत शिकणाऱ्या भाच्याला शिक्षणाच्या निमित्तानं आपल्या घरी ठेवलं होतं. दरम्यान भाच्याकडे समवयस्क मित्रांचं येण-जाणं वाढलं होतं. यातूनच घरातील 50 तोळे सोनं चोरून मुंबई पुण्यात हौसमौज करण्यासाठी जाण्याची भन्नाट कल्पना संबंधित सर्वांना सुचली होती.त्यानुसार आरोपी भाच्यानं आपल्या अन्य सहा मित्रांच्या मदतीनं घरातील 50 तोळे सोन्यावर डल्ला मारला. यानंतर आरोपींनी हे दागिने आपसात वाटून घेतले. तसेच 1 सप्टेंबर रोजी भाच्यासह तिघांनी पुणे, मुंबईला जाऊन आपले शौक पूर्ण केले आहेत. दरम्यान गावातील तिघे एकाच दिवशी गायब झाल्यानं नातेवाईकांची चौकशी सुरू करण्यात आली. तेव्हा भाच्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत कोणाला किती दागिने दिले याचा तपशील लिहिला होता.

कर्जाला कंटाळून एकाच कुंटाबातील तीन जणांची गळफास घेवुन आत्महत्या…

Related Posts
1 of 1,603

त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार पुणे, मुंबईला फिरायला गेलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी बीडमध्ये आणून सातही जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यातील एका आरोपीनं 65 हजारांचा महागडा मोबाइल फोन खरेदी केला होता. तर दुसऱ्या ने 14 तोळे सोनं एका खाजगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून लोन घेतलं होतं. तर एका पठ्ठ्यानं 10 तोळे सोनं एका सराफाला अवघ्या दीड लाखात विकलं होतं. या गुन्ह्यातील सातही आरोपी अल्पवयीन असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: