NEET परीक्षा होणारच

येत्या १३ सप्टेंबरला देशव्यापी परीक्षा होणार
नवी दिल्लीः नीट परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. 13 सप्टेंबरला होणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी किंवा रद्द करण्याची विनंती करणार्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोरोना या जागतिक महामारी (corona)च्या दरम्यान नीट परीक्षा घेण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक पावले उचलणार आहेत. “क्षमस्व, आम्हाला ऐकायचे नाही,” असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावल्या.