राष्ट्रवादीचा भाजपाला दे धक्का ,भाजपचे २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0 2,826
 नवी मुंबई –  राष्ट्रवादी (NCP) चे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या उपस्थितीत उल्हासनगरमध्ये  भारतीय जनता पक्षाच्या (BJP) २१ विद्यमान नगरसेवकांनी (Corporators) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात उल्हासनगरमध्ये महापालिका निवडणूक होणार असून २१ विद्यमान नगरसेवकांनी भाजपाला रामराम केल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  यासोबतच १९ माजी नगरसेवकांनीदेखील हातावर घड्याळ बांधलं आहे. भाजपचे आणखी १० नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. (NCP’s push to BJP, 21 BJP corporators join NCP)
 
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आगामी महानगर पालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारून आपला महापौर बनवणार असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबाची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर शहरात राजकीय घडामोडीला वेग आला होता.
Related Posts
1 of 1,635

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले सर्व नगरसेवक आज स्वगृही परतले आहेत. या बदललेल्या समीकरणामुळे उल्हासनगरमध्ये आता पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबाची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर शहरात राजकीय घडामोडीला वेग आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यावर, शहरजिल्हाध्यक्ष पदी कोण होणार ? याची चर्चा जोराने होत होती. आज बुधवारी भाजप नगरसेवक पंचम कलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे दिल्यावर, त्यांची राष्ट्रवादीच्या शहरजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पंचम कलानी यांनी आज आपल्या इतर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.(NCP’s push to BJP, 21 BJP corporators join NCP)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: