
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर पक्ष लवकरच मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याचे संकेत दिले आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार समजले पाहिजेत. हे विचार कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कर्जत जामखेडमध्ये पंचवीस वर्षे सुरू आसलेली दहशत संपवली आहे. बाहेरून गुंड आणून दहशतीचे राजकारण होत होते. मात्र हे राजकारण आम्ही मोडून काढले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली पाहिजे यासाठी जोमाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कारण आपल्याला कर्जत जामखेड मधून भाजप हद्दपार करायची आहे, असेही पवार म्हणाले.