”राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला”- शिवसेना नेते अनंत गीते

0 241
रायगड –  राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shiv Sena) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि काँग्रेस (Congress) या पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. या आघाडीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या विधीमंडळाचा नेता निवडून त्यांना राज्याचे मुख्यमंत्री पद दिले. मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी अद्याप या आघाडीतील अनेक नेते एकत्र दिसत नाही. तिन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात काहींना काही टीका करतच असतात. अशीच टीका आता शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली आहे.  शरद पवार आमचे नेते होऊ शकत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केला आहे. (“NCP was born with a dagger in the back of Congress” – Shiv Sena leader Anant Geete)
माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) म्हणाले कि राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. केवळ तडजोड महाविकास आघाडीत असल्याचेही अनंत गीते म्हणाले आहेत.

अनंत गीते पुढे म्हणाले की, दुसरा कोणताही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण तो आमचा गुरु होऊच शकत नाही, बाळासाहेब ठाकरेच फक्त आमचे गुरु होते आणि राहतील. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुटेल त्यादिवशी काय?

Related Posts
1 of 1,635

हे पण पहा – Exclusive : १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त!

काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, त्यांचे एकमेकांशी कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? एक विचारांची दोन काँग्रेस होऊ शकत नाही, तर काँग्रेस विचारांची शिवसेना ही कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असल्याचे ते म्हणाले.शिवसेनाचे माजी खासदार अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल. (“NCP was born with a dagger in the back of Congress” – Shiv Sena leader And Ex MP Anant Geete)

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: