नाहटा यांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिरवली पाठ

0 193
NCP leaders turn a blind eye to Nahta's civic reception
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील बाळासाहेब उर्फ प्रविणकुमार बन्सीलला नहाटा यांची महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या महासंघावर सभापती पदी निवड झाल्यानंतर त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादी च्या नेत्यांनी (NCP leaders) पाठ फिरवली असल्याने चर्चेचा विषय बनला होता.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवाशी यांनी ग्रामपंचायत पासून राजकारणात प्रवेश केला त्यातून आज ते महासंघावर निवड झाल्यानंतर भव्य नागरी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता मात्र तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे एकही नेता उपस्थित नसल्याने तसेच गावातील नागरिक अतिशय अल्प प्रमाणात उपस्थित असल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता तसेच वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस ,भगवान गोरखे ,गणपतराव काकडे,विजय शेंडे ,भरत नाहटा, यांच्यासह तालुक्यातील अनेक नेते उपस्थित होते.
Related Posts
1 of 2,452
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला भाजप चे कार्यकर्ते  उपस्थित
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने नाहटा यांनी महासंघावर निवड झाल्यानंतर नागरी सत्कार कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी सभापती भैय्या लगड व उपसभापती शहाजी हिरवे यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनला होता.
हे नेते कुठे आहेत ?
तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार माजी आमदार राहुल जगताप ,जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती आण्णासाहेब शेलार तसेच तालुक्यातील इतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित नसल्याने हे नेते कशामुळे आले नाहीत याच्या विषयी तर्क वीतर्क लढविले जात होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: