सिद्धटेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, ग्रामपंचायतवर महिलाराज 

0 12

श्रीगोंदा  –  कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेलं अष्टविनायक पैकी एक सिद्धिविनायक गणपती मुळे राज्यात प्रसिद्ध असलेलं सिद्धटेक हे चार हजार मतदार असलेलं एक गाव. या गावात सिद्धटेक, देऊळवाडी,वडार वस्ती आणि बर्डी ही गावे सिद्धटेक बर्डी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहेत. अकरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच बिनविरोध सदस्य आणि बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान सौ पल्लवी सुजित गायकवाड यांनी मिळून एक इतिहास रचला असून उपसरपंचपदी सौ.योगिता अमोल भोसले यांची बहुमताने निवड करण्यात आली ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचे पालन करून पार पडली.

उदयनराजे यांच्या भेटी नंतर नाना पटोले म्हणाले जस्ट वेट अँड वॉच 

सहाय्यक निवडणूक अधिकारी भरत नारायण गाढवे  आणि ग्रामसेवक अमोल श्रीराम बरबडे यांच्या  मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी अभिजीत रामभाऊ मांढरे आणि पल्लवी सुजित गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले होते मात्र अभिजीत मांढरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने पल्लवी सुजित गायकवाड या सरपंच पदी बिनविरोध निवडून आल्या तर तर उपसरपंच पदासाठी रमेश विठ्ठल पवार आणि योगिता अमोल भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यावेळी सौ योगिता अमोल भोसले यांना आकरा पैकी सहा मते मिळाल्याने त्या बहुमताने उपसरपंच म्हणून निवडून आल्या सरपंच व उपसरपंच या दोन्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या असल्याने राष्ट्रवादीने सत्ता प्रस्थापित करून आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवला आहे.

 

नाना पटोले यांना फक्त प्रदेशाध्यक्ष पद तर विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत ?

Related Posts
1 of 1,290

 या निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना सरपंच पल्लवी गायकवाड म्हणाल्या की महिला सरपंच व उपसरपंच पदावर असल्याने महिलांच्या अडचणी सोडविण्यास प्रथम प्राधान्य देऊ.’स्मार्ट सिटी’ योजना राबवली जाऊ शकते तर मग ‘स्मार्ट व्हिलेज ‘ का नाही. गावात सीसीटीव्ही यंत्रणा रस्ते महिलांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्याकडे भर देणार असून आमच्या नवीन पिढीची आधुनिक विचारसरणी आणि जुन्या पिढीचा अनुभव यांचा मिलाफ करून गाव विकासाच्या वाटेवर वेगाने प्रगती करत नेवू यासाठी गावातील वाड्या-वस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढी विकास कामे करता येतील ही सर्व कामे आम्ही सर्वच सदस्यांना सोबत घेवून करणार असून सिद्धटेक हे विकासाचे मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पल्लवी गायकवाड यांनी व्यक्त केला .

धक्कादायक !महिलेची हत्या करून मृतदेहवर अ‌ॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न

यावेळी अर्जुन भोसले, भाऊसाहेब शेळके, सारंग पाटील नलगे, चिंतामण सांगळे, मोहन भोसले, गणेश भोसले, सचिन बनकर, गोविंद भोसले, दादासाहेब कोराळे, वैभव पालेकर, किशोर सांगळे, माऊली भोसले, सोमा चव्हाण, रामभाऊ भोसले ,अंकुश भोसले, पांडुरंग भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: