एनसीबीची मोठी कारवाई, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी एकला अटक

0 202

नवी मुंबई – गांधी जयंती ०२ ऑक्टोबर रोजी एनसीबी (NCB) ने मुंबईतील एका क्रूझवर छापेमारी करत अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)ला ड्रग्ज पार्टी (Drugs party) प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा  तपास  करत असताना आता एनसीबीने एका 24 वर्षीय ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण प्रमुख संशयित असून ज्याचं नाव ड्रग्जशी संबंधित चॅटमध्ये समोर आला आहे.  (NCB’s big action, one more arrested in cruise drugs case)

या तरुणाला मध्यरात्री एनसीबीने  3.45 वाजता अटक करून एनसीबी कार्यालयात आणण्यात आले आहे. तर दुसरीकडे आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी आणखी दोघांना समन्स पाठवण्यात आले आहेत. चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे समन्स दोन अभिनेत्यांच्या मुलींना पाठवलेत. या समन्समध्ये आज चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तर एनसीबीने काल अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) याची मुलगी चर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिचा देखील नाव समोर आला असून एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकला होता . मिळालेल्या माहिती नुसार  एनसीबीला आर्यन खानसोबत उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीच्या व्हाट्सअँप चॅट मिळालेल्या आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीची एक टीम गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचली आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेली. एनसीबीच्या टीमने त्यांच्यासोबत अनन्याच्या घरातून काही वस्तूही घेतल्या आहेत, पण त्या काय आहेत हे माहित नाही.

ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा

Related Posts
1 of 1,540

आर्थर रोड तुरुंगात पोहोचला शाहरुख

गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास शाहरुख खान आर्थर रोड तुरुंग मध्ये आर्यनच्या भेटीसाठी पोहोचला होता. त्याची आणि आर्यनची साधारण दहा मिनिटं भेट झाली. कोरोना मुळे बंदी असलेल्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नव्हते मात्र गुरूवारपासून दोन व्यक्तींना भेटता येणार आहे. त्यामुळे शाहरूख खाननं गुरुवारी आर्यनची भेट घेतली.  (NCB’s big action, one more arrested in cruise drugs case)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: