ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा

0 262

नवी मुंबई –   बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)ला एनसीबी (NCB) ने  02ऑक्टोबर रोजी क्रुझवर ड्रग्स पार्टी (Drugs party)  प्रकरणात अटक केली होती सध्या तो मुंबईमधील आर्थर रोड तुरुंगात आहे.या प्रकरणाचा अधिक तपास एनसीबी करत आहे. या तापस अंतर्गत आता अभिनेता चंकी पांडे (Chunky Pandey) याची मुलगी चर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिचा देखील नाव समोर आला असून एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहिती नुसार  एनसीबीला आर्यन खानसोबत उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीच्या व्हाट्सअँप चॅट मिळालेल्या आहे. (NCB raids actress Ananya Pandey’s house in drug party case)

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीची एक टीम गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचली आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेली. एनसीबीच्या टीमने त्यांच्यासोबत अनन्याच्या घरातून काही वस्तूही घेतल्या आहेत, पण त्या काय आहेत हे माहित नाही.

शाहरुख खानने घेतली आर्यन खानची भेट.., पहा हा व्हिडिओ

Related Posts
1 of 1,520

आर्यन खानच्या अटकेनंतर, एनसीबीने त्याच्या व्हॉट्सअप चॅटमधून एका अभिनेत्रीसोबत ड्रग्ज विषयी चॅट मिळाल्याचा दावा केला. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही.व्ही.सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय टीम पहाटे पहाटे अनन्या पांडेच्या घरी चौकशीसाठी पोहोचली. आर्यनच्या एनसीबी  सोबतच्या काही  व्हाट्सअँप चॅट  मध्ये तो या अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतो. एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहे.  (NCB raids actress Ananya Pandey’s house in drug party case)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: