DNA मराठी

नवाब मलिकांना दिलासा नाही; ‘या’ तारखेपर्यंत राहावे लागणार तुरुंगात

0 268
Great relief to Nawab Malik; Permission granted by the court in 'that' case
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
मुंबई –  मनी लॉन्ड्रिंग (money laundering ) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज देखील दिलासा मिळाला नाही. त्यांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये १८ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Nawab Malik is not relieved; He will have to stay in jail till this date)
 
फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावर  दाऊद गँगशी संबंधित व्यक्तिकडे जमीन खरेदी केल्याचा आरोप करून ईडीने (ED)त्यांना अटक केली होती. मलिक यांची कोठडी संपल्याने आज त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना तुरुंगात खुर्ची, बेड आणि अंथरुण देण्यास परवानगी दिली आहे.
Related Posts
1 of 2,487

 

दरम्यान, मलिक यांच्यावर झालेले आरोप निखालस खोटे असल्याचा दावा मलिक यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीने केला आहे. राजकीय सूडबुद्धीतूनच मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.  (Nawab Malik is not relieved; He will have to stay in jail till this date)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: