नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली, मेंदू व तब्येत तपासून घ्या – श्वेता महाले

0 392
नवी मुंबई –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे मागच्या काही दिवसांपासून एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhade) यांच्यावर  टीका करत आहे. याबरोबरच त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहे. (Nawab malik has jaundice due to drugs, check his brain and health – Shweta Mahale)
त्यानंतर नवाब मलिक यांना उत्तर देत फडणवीस यांनी आपण दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं.मात्र सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका करत आहे. या नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडला गेला आहे ते म्हणजे आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांचा होय. श्वेता महाले यांनी  एक ट्विट करत नवाब मलिक याच्यावर टीका केली आहे.
श्वेता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या. अशी टीका त्यांनी आपल्या ट्विटमधून नवाब मलिक यांच्यावर केली आहे. आता या टीकेला नवाब मलिक काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

 

Related Posts
1 of 1,518

 

याआधी देखील या प्रकरणावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी देखील नवाब मलिक बरोबर महाविकास आघडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Nawab malik has jaundice due to drugs, check his brain and health – Shweta Mahale)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: