नवाब मलिकांचा पुन्हा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप ट्विट करत म्हणाले…..

0 158

नवी मुंबई –  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी परत एकदा एनसीबी (NCB) च्या विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहे. यावेळी देखली नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (Nawab Malik again tweeted serious allegations against Sameer Wankhede and said …..)

नवाब मलिक यांनी आज आपल्याला ट्विटर अकाऊंट वरून समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूपत्राचे दाखले शेअर केले आहेत. यामधील एका दाखल्यात हिंदू तर दुसऱ्यात मुस्लिम असा उल्लेख आहे.

समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे दाखले शेअर केले आहेत. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचं निधन झाल्याचा उल्लेख या दाखल्यात आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं आहे. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेक आहे.

जमिनीच्या वादातून खून केल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेप

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की अजून एक फर्जीवाड़ा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे, असं नवाब मलिक यांनी केला आहे.

Related Posts
1 of 1,494

प्रकरण गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील – नवाब मलिक

क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे  आणि पार्टीमध्ये असलेला दाढीवाला ड्रग्ज माफिया यांच्यात दोस्ताना असल्यानेच  त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट करण्यात आला असून याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने तपासावे. जर त्यात त्यांना काही सापडत नसेल तर वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग माझ्याकडे आल्यास ते पुरावे द्यायला तयार आहे माझा चौकशी समितीवर सवाल नाही परंतु हे प्रकरण गंभीर असून ते गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीला दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले  एनसीबीच्या अधिकार्‍याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते. ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सूचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही. परंतु ज्यापद्धतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो असा प्रश्न नवाब मलीक यांनी उपस्थित केला.

समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी जी समिती आली आहे त्यांनी पंचांना बोलावले आहे. एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्याआधारे कारवाई करते असे सांगितले जाते. प्रभाकर साहीलने संपूर्ण घटनेबाबत प्रतिज्ञापत्र व व्हिडीओ करून प्रसारित केला आहे. चौकशी समितीने समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर माने या सर्वांचा सीडीआर काढावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. (Nawab Malik again tweeted serious allegations against Sameer Wankhede and said …..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: