नवज्योत सिंग सिद्धू होणार पंजाब राज्याचे उपमुख्यमंत्री……?

0 18

  नवी दिल्ली –   पंजाबमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. मागच्या काही दिवसांनी काँग्रेस पक्षावर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असणारे काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे .

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग  हे बुधवारी दुपारी  नवज्योत सिंग सिद्धू  यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते सिद्धूंवर पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 होणाऱ्या निवडणुकांपूर्वी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सिद्धू यांना काँग्रेस पंजाबचे उपमुख्यमंत्री  करण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

मंत्रिमंडळात होणार फेरफार ? नाना पटोले यांनी दिली ही प्रतिक्रिया….. 

नवज्योत सिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यामध्ये दुपारच्या भोजनानिमित्त होणारी ही दुसरी भेट आहे. याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या प्रकारची पहिली भेट झाली होती. दोन्ही गटांमधील नाराजी दूर करण्याचा मार्ग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. सिद्धू यांची या पद्धतीने भेट घेणार असल्याचं सिंग यांनी तेव्हा सांगितलं होतं. सिद्धू यांनी 2019 साली स्थानिक पालिका मंत्रालय काढून घेतल्याच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व सिद्धू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Posts
1 of 1,292

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस नेते आणि पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी सिद्धू यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. रावत यांनी 10 मार्च रोजी सिद्धू यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही भेट सकारात्मक झाल्याचा दावा सिद्धू यांनी केला होता.

वाझे प्रकरण शरद पवारांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली नाही – संजय राऊत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: