कंगना रनौतविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शीख सेल आक्रमक..

0 189
नवी मुंबई – आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत राहणारी बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Actress Kangana Ranaut) याचा अडीअडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कंगनाने काही दिवसांपूर्वी शीख समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून शीख संप्रदायाच्या भावना दुखावल्या होते. याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शीख सेलचे राज्य प्रमुख जरनैलसिंघ गाडीवाले यांनी नांदेड येथील वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.(Nationalist Congress Sikh Cell Aggressive Against Kangana Ranaut ..)
देशहितासाठी वेळोवेळी प्राणांचे बलिदान देणारा शीख समाज अशा अपमानास्पद वक्तव्याला कधीही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया गाडीवाले यांनी व्यक्त केली. तसेच कंगना रनौतविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

भाजपच्या कंगनाबेनकडून स्वातंत्र्याचा अपमान-  संजय राऊत 

एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री कंगना ने वादग्रस्त विधान करत भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले असा वादग्रस्त विधान केला आहे. यानंतर तिच्यावर आता चाऱ्ही बाजूने टीका होत आहे.कंगनाच्या या विधानानंतर आता शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अभिनेत्री कंगन रानौतवर जोरदार टीका केली आहे.त्यांनी कंगनाला दिलेला राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. मुंबई मध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Related Posts
1 of 1,481

Cryptocurrency वर बंदी येणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

संजय राऊत म्हणाले कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे.तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे राऊत यांनी म्हटले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: