
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील बाळासाहेब नाहटा (Balasaheb Nahta)यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्पेशल कोठ्यातून महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर लोणी व्यंकनाथ येथील भव्य नागरी सत्कारात नाहटा बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पाणीचोर आहेत असा एकेरी उल्लेख केल्याने निवड केल्यानंतर पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस ला नाहटा यांनी घरचा आहेर दिला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Related Posts
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील बाळासाहेब उर्फ प्रविणकुमार बन्सीलला नहाटा यांची महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या महासंघावर सभापती पदी निवड झाल्यानंतर त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला पारंपरिक वाद्य संगीत तसेच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती मात्र या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष वगळता सर्वच नेत्यांनी पाठ फिरवली होतीच हा चर्चेचा विषय बनला असताना बाळासाहेब उर्फ प्रविणकुमार नाहटा यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पाणीचोर आहेत वरती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके हे पाणी घेतात तर श्रीगोंदा तालुक्याच्या खालील तालुका कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत करमाळा या ठिकाणी पाणी नेतात यामध्ये श्रीगोंदा तालुका कायम कुकडीच्या पाण्यासाठी वंचित राहिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या महासंघावर सभापती म्हणून निवड केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत बाळासाहेब नाहटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदार यांच्यावर मोठ्या प्रमाणत टिकाश्र केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना नाहटा यांनी घरचा आहेर दिला आहे त्यामुळे याची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते घेणार का ? हा घरचा आहेर सहन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.