
ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या मालकीच्या या सदनिका होत्या. हमसफर कंपनीकडून विनातारण पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं होते. याच प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करत आगे आगे देखिए होता है क्या असं उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
आगे आगे देखिए होता है क्या!
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.
सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या!— Narayan Rane (@MeNarayanRane) March 22, 2022
नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच, असा निशाणा नारायण राणे यांनी साधला आहे.(Narayan Rane warns Uddhav Thackeray after ED action; ‘that’ tweet in the discussion)
आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 22, 2022