नाना पटोले म्हणतात मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल….

0 150

 नागपूर –   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat ) यांनी  हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असून मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे. असे वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक चारही बाजूने टीका करत आहे. या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करत ते कुठले डॉक्टर आहेत हे तपासावं लागेल असा टोला लावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले  संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसनेही मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं. डीएनए एक म्हणणारे मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल, असा टोला पटोलेंनी लगावला.

अहमदनगरसह “या” जिल्ह्यांनी सतर्क राहावे , आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

Related Posts
1 of 1,635

नेमका काय म्हणाले होते मोहन भागवत 
मोहन भागवतांनी एका कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचं म्हटलं होतं. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे, त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे. ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली.त्यामुळेच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला हवा, असं मोहन भागवत म्हणाले होते.

हे पण पहा – भरपावसात निलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: