नाव राणे आणि चर्चा मात्र चार आण्याची अब्दुल सत्तार यांची नारायण राणे यांच्यावर टीका

0 255

पुणे  – राज्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane)  आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. याच प्रकरणात आता राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एन्ट्री घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नाव राणे आणि चर्चा मात्र चार आण्याची करतात अशी टीका त्यांनी नारायण राणे आणि शिवसेना प्रकरणावर बोलताना दिली आहे. अब्दुल सत्तार आज पुणे येथे एका ग्राम पंचायतीच्या कार्यालयाचं उदघाटन करताना बोलत होते.

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फक्त बोलण्यासाठी भाजपमध्ये घेतलंय. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्छा फक्त चार आण्याची करतात, असा टोला सत्तार यांनी राणेंना लगावला. बाळा साहेबांनी नाऱ्याचा नारायण केला. बाळासाहेब ठाकरे यांनी नाऱ्यापासून त्यांना नारायण राणेंपर्यंत पोहोचवलं. त्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे होतं. पण ते विसरलेले दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आणि राणे कुठे? असेही अब्दुल सत्तार म्हणाले.  राणेंना पक्षात घेऊन भाजपानं खूप मोठी चूक केली असल्याचंही ते म्हणाले.

Rain in Maharashtra ,राज्यात येणाऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस

Related Posts
1 of 1,635

भाजपासोबतच नातं खूप चांगलं होतं. पण राणेंच्या समावेशानं आता नात्यात खूप वितुष्ट निर्माण झालं आहे. भाजपा आमच्या सोबत होता तोवर ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते. पण आता राणेंच्या समावेशामुळे ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहे, भाजपानं याचं आत्मचिंतन करावं, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

हे पण पहा –Rohit Pawar I ढोल वाजवण्याचा आणि नृत्याचा मोह आमदार रोहित पवारांना आवरला नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: