नायब तहसीलदार संपावर….
गेली २५ वर्षे राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात

मुंबई :विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून (ता. तीन) संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील ३५८ तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट असण्याची शक्यता आहे.
Soldier came to help :- आरडाओरडत झाला सैनिक मदतीला धाऊन आला
नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती.
Onion News: कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करा… पणन संचालकांचे आवाहन.
त्यामुळे गेली २५ वर्षे राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास, राज्यातील २२०० पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना लाभ होईल आणि सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष २.६४ कोटी रुपयांचा बोजा वाढेल.
त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.