नागवडे कारखाना निवडणुकीत नागवडे यांचा झेंडा, उडवला दिग्गजांचा धुव्वा

0 302

श्रीगोंदा :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत(Nagwade factory) स्व.शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर, भाजपचे खासदार विखे समर्थक अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, जिजाबापु शिंदे, वैभव पाचपुते या दिग्गजांचा धुव्वा उडविला.

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अटी तटीची झाली. या मुळे २१ जागांसाठी दि.१४ रोजी १९,८८२ मतदानापैकी १६,९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवार दि.१५ रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत श्रीगोंदा गटात नागवडे गटाचे विजयी उमेदवार शिंदे सुभाष ९,९७०, भोस बाबासाहेब ९,८७४, बेलवंडी गटात लबडे भीमराव ९,४३७ , रायकर लक्ष्मण ९,९७०, काकडे दत्तात्रय ९,९७३ टाकळी कडेवळीत गटात नागवडे गटाचे नेटके भाऊसाहेब ९,८६०, दरेकर प्रशांत ९,९५९, रसाळ सुरेश ९,७२३ लिपणगाव गटात जंगले विठ्ठल ९,५४८, गिरमकर जगन्नाथ ९,८९२, शिपलकर प्रशांत ९,३१४ हे विजयी झाले, तर सेवा संस्थेत राजेंद्र नागवडे यांनी २५ मते घेऊन दणदणीत विजय मिळविला.

१० गटपैकी पैकी ४ गटांची मतमोजणी पूर्ण झाली होती.काष्ठी गटात राजेंद्र नागवडे यांना १०,५६३ मतांनी विजयी झाले आहेत तर राकेश पाचपुते ९,६८३ विजयी झाले आहेत तर उर्वरित गटांची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. एकंदरीत निवडणुकीचा कल पाहता नागवडे यांनी २१ – ० केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती मात्र जवळपास सर्वच ठिकाणी राजेंद्र नागवडे गटाने मोठ्या प्रमाणात धुव्वादार बॅटींग करत सर्वच ठिकाणी चितपट केले आहे त्यामुळे नागवडे यांनी अनेक दिग्गजांना घराचा रस्ता दाखवला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

पुन्हा इंदुरीकर महाराज अडचणीत , “त्या” विधानावरून कारवाईची मागणी

राजकारण सोडणार नाही – मगर

सभासदांनी निवडणुकीत दिलेला कौल आम्हाला मान्य आहे तरीही पुन्हा जोमाने उभे राहून राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे केशवभऊ मगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Posts
1 of 1,640

अनेकांचे अंदाज चुकले

सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे निवडणूक निकालावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात अंदाज व्यक्त केले होते मात्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्याने सर्वांचे अंदाज चुकले आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

बापूच्या विचारांचा विजय – नागवडे

नागवडे कारखान्यात भरघोस मतांनी विजय मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अनुराधा नागवडे यांनी सांगितले की हा तर बापूच्या विचारांचा तसेच सभासदांनी नागवडे कुटुंबातील लोकांवर दाखवलेल्या विस्वास आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: