
श्रीगोंदा :- सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा काल गाळप हंगाप समाप्त झाला असून गाळप हंगामाचा शेवट जळक्या उसाने झाला असला तरी ऊसतोडणी कामगारांनी गाळपाची सांगता डीजेच्या तालावर नाचत मिरवणूक काढून केली आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर करखाण्याचा चालुवर्षीचा गळीत हंगाम आता समाप्त झाला आहे त्यामुळे ऊसतोडणी कामगार आता परतीला आपल्या गावी निघाले असताना त्यांनी यथेच्छ सोमरस प्राशन करून गावातून डीजेच्या तालावर नाचत गुलाल उधळत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली होती सायंकाळी 5 च्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली होती सायंकाळी 7 वाजे पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती नंतर मटणाच्या जेवणावळी उठविण्यात आल्या या मिरवणुकीची गावातील शेतकरी यांच्यात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र याबाबत गावातील कोणताही राजकीय नेता बोलण्यास तयार नसल्याने मिरवणूक गावात चर्चेचा विषय बनली होती .
शेतकऱ्याचा ऊस शेतात कारखाना बंद ?
तालुक्यातील टाकळी कडे गावातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही शेतात उभे असताना गाळप हंगाम संपल्यावर त्या उसाचे काय करणार ?असा प्रश्न शेतकर्यांसमोर असताना मिरवणूक काढून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात चेष्टा केल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसत होती.
जळीत उसाने गाळप हंगामाची सांगता
ऊस तोडणी मिळत नसल्याने अनेक शेतकऱयांनी पोटच्या पोरासारखे जपलेल्या उसाला हाताने आग लावली मग जळीत म्हणून उसाला तोड मिळाली त्यामुळे कारखानदार यांचेकडून शेतकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात टिंगल उडवली जात आहे अशीही एका शेकर्यांने प्रतिक्रिया दिली आहे.
उभ्या सुरू आडसाली उसाचे काय करणार ?
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या अनेक सभासदांचे सुरू आडसली ऊस अजूनही उभे आहेत त्याचे आता चेरमण आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांना उत्तरे द्यावीत अशी मागणी टाकळी कडे मधील शेतकरी करताना दिसत आहेत