नगर – कल्याण रोड सिना नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन ….

0 180

 अहमदनगर –   शिवाजी नगर नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंत हा रोड अतिशय खराब झाला आहे . या रस्त्याच्या दुरुस्ती साठी नगर कल्याण रोड (Nagar – Kalyan Road) शिवाजीनगर येथे सकाळी आकरा वाजता नगरसेवक स्थायी समिती सदस्य सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आठ दिवसाच्या आत रस्त्याच्या काम पुर्ण झाले नाही तर अधिकाऱ्याना दालनात कोंडणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

नगर कल्याण रोड नॅशनल हायवे असल्यामुळे शहरी भागातून जातो. त्यामुळे या ठिकाणी जाण्याची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या खराब रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसाळ्याच्या पाण्यामुळे गाडी स्लीप होऊन अपघात होत आहे.  अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे . निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. नागरिकांचे प्रचंड या रस्त्यावर हाल होऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला  देण्यात आले होते.

त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे आज सकाळी अकरा वाजता सीना नदीच्या पुलावर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले की    कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ वरील अहमदनगर बायपास ते सक्कर चौक व स्टेट बँक चौक ते मेहेकरी या १८.५० किमी लांबीमध्ये डांबरी मजबुतीकरणाचे काम व उड्डाणपुल ते सीना नदी पर्यंत दोन्ही बाजूस काँक्रीट गटर बांधण्याचे काम मंजुर आहे. रस्त्याच्या उड्डाणपुल ते नेप्ती नाका ते अमरधाम या लांबीमध्ये पावसाळा असल्यामुळे खड्डे भरणेचे काम यापूर्वी wmm (खडी) मटेरिअलने करण्यात आले होते. तसेच काही भागात डांबरीकरणानेही खड्डे भरणेचे काम करण्यात आले होते. परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुन्हा नव्याने खड्डे पडलेले आहेत. सद्यस्थितीत पाऊस थोडा थांबला असलेने वरील लांबीमध्ये त्वरित डांबरीकरणाने खड्डे भरणेबाबत कंत्राटदारास सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कंत्राटदाराकडुन डांबरीकरणाने खड्डे भरेणेबाबत काम सुरु करण्यात येत आहे. तसेच या भागातील डांबरीकरणाचे काम निविदेनुसार पुर्ण करून लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करणेत येईल याबरोबरच काँक्रीट गटारचे कामही त्वरीत सुरु करणेचे नियोजन केले आहे.

स्वप्न बघण्यावर देशात अद्याप जीएसटी लागलेला नाही, संजय राऊतांचा पाटील यांना टोला

Related Posts
1 of 1,481

कार्यालयाकडून कंत्राटदाराकडे कामाकरिता नियमित पाठपुरावा करण्यात येत असू लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यात येईल. नियोजित रस्ता रोको आंदोलन मागे घ्यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, दिनकर आघाव, जयप्रकाश डीडवानिया, संजय साकुरे, सुबोध कुलकर्णी ,गणेश शिंदे,अविनाश पांढरे,राजू ढोरे , सुबोध कुलकर्णी , भालचंद्र सोनवणे , पै. संभाजी लोंढे आदीसह नागरिक उपस्थित होते.

हे पण पहा – जन्मदात्रीनेच दिल्या बालिकेला मरणयातना | आजही होत आहेत बालविवाह | ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: