अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर चौकात चुलत्याने केला पुतण्याचा खून

0 470

नवी मुंबई –   अनैतिक संबंधाच्या (Immoral relations) संशयावरून चुलत्याने (Cousins) पुतण्याचा ( nephew ) भरदिवसा कुराड आणि कोयत्याने मानेवर वार करून खून (Murder) केला.  ही धक्कादायक घटना  वाळवा तालुक्यातील येलूर येथे घडली आहे.  रणजीत रमेश पाटील (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कुरळप पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी दुपारी येलूर गावच्या चौकात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.(Murder of nephew in Chowk on suspicion of immoral relationship)

याप्रकरणी मृताचा चुलतभाऊ प्रवीण पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. खूनप्रकरणी पोलिसांनी आनंदराव सावळा पाटील व अमोल आनंदराव पाटील या दोघांना ताब्यात घेतले आहे. मृत तरुण रणजीत याचे आपल्या सुनेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय चुलते आनंदराव पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील यांना होता. त्यावरून गेल्या काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यानंतर पोलिस आणि गावातील काही व्यक्तींनी रणजीतला समज दिली होती.

स्वतःमध्ये वेळीच बदल करा, अन्यथा…, मोदींचा भाजप खासदारांना इशारा

तरीही रणजीत याचा सतत त्रास सुरू होता. दरम्यान, आज रणजीत हा दुपारी चौकात आल्यानंतर आनंदराव व अमोल पाटील या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने व कुर्‍हाडीने मानेवर वार केले. जखमी रणजीत याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. (Murder of nephew in Chowk on suspicion of immoral relationship)

Related Posts
1 of 1,603

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: