अनैतिक संबंधातून आठ वर्षीय मुलाची हत्या , आरोपीला अटक

0

 नवी मुंबई –    मुंबई मधील भिवंडी परिसरात आठ वर्षीय मुलाचा अपहरण करून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी अवघ्या अठरा तासांत हत्येचा उलगडा केला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र मधेशिया या संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याची कसून तपासणी केली असता त्यानेच आपल्या अनैतिक संबंधातुन आठ वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Murder of eight-year-old boy in immoral relationship, accused arrested)

आरोपी भिवंडी तालुक्यातील कारीवली गावातील एका कुटुंबाच्या घरी खानावळीसाठी येत होता. या दरम्यान आरोपीचं संबंधित कुटुंबातील विवाहित महिलेशी सूत जुळलं. घरी जेवणासाठी आल्यानंतर तो अनेकदा विवाहित महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करत असे. दरम्यान, घरी जेवणासाठी येणाऱ्या व्यक्तीचं आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती आठ वर्षाच्या मुलाला मिळालेल्या नंतर मुलानं याबाबतची माहिती आपल्या वडिलांना सांगितली.

त्यानंतर मृत मुलाच्या वडिलांनी आरोपी जितेंद्र मधेशिया याच्याशी बाचाबाची करत त्याची खानावळ बंद केली. हाच राग मनात धरून आरोपी जितेंद्र मधेशिया यानं अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या आठ वर्षीय मुलाचं अपहरण करत त्याची गळा आवळून हत्या केली आहे. बराच वेळ झाला तरी मुलगा सापडत नसल्यानं मृत मुलाच्या वडिलांनी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.

एसएससीने जाहीर केली जीडी कॉन्स्टेबलची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शुक्रवारी पहाटे आठ वर्षीय मुलाचा मृतदेह कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सापडला . याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी जितेंद्र मधेशिया याला अटक केली आहे. आरोपीनं खेळण्याच्या बहाण्याने चिमुरड्याला चौथ्या मजल्यावर नेऊन त्याची गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. अवघ्या अठरा तासांच्या आत भोईवाडा पोलिसांनी हत्येची उकल केली आहे. आरोपी जितेंद्र मधेशियाला न्यायालयानं 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Murder of eight-year-old boy in immoral relationship, accused arrested)

पंकजा मुंडे यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर – रामदास आठवले

Related Posts
1 of 1,153
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: