धक्कादायक ! बहिणीच्या अनैतिक संबंधातून भावाची हत्या, आरोपीला अटक

0 463
नागपूर-  नागपूर (Nagpur) मध्ये एका १२ वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. सुजल नाशिक रामटेके असं हत्या (Murder) झालेल्या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अनैतिक संबंधाचा आपल्या गावात चर्चा होऊ नये म्हणून ही हत्या (Murder) करण्यात आल्याची पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर मृत मुलाच्या 17 वर्षीय बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. (Shocking! Murder of brother due to immoral relationship of sister, accused arrested)
मिळालेल्या माहितीनुसार  सोमवारी सुजलचे आई वडील दोघेही कामावर गेले होते. दरम्यान घरी सुजल आणि त्याची सतरा वर्षीय बहीण होती. दुपारी सुजल दुकानात जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. मात्र दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडत घरी आला, त्यानंतर सुजलच्या बहिणीनं त्याला पाणी प्यायला दिलं. त्यानंतर सुजल निपचित पडला, अशी माहिती सुजलच्या बहिणीने शेजाऱ्यांना दिली.  यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील बहिणीनं अशीच माहिती दिली. पण मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमात अनेक विसंगती आढळून आल्या.
Related Posts
1 of 1,603
तसेच मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीनेच भावाची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी बहीण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली आहे. त्यानंतर दोघांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणूनच निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी 17 वर्षीय मुलीसह तिच्या प्रियकराला रात्री उशिरा अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.(Shocking! Murder of brother due to immoral relationship of sister, accused arrested)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: