शुल्लक कारणावरून युवकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या?

औरंगाबाद – औरंगाबाद (Aurangabad) शहरातील कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोर रविवारी दि. 12 सप्टेंबर रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास 18 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने ( Sharp Weapon ) वार हत्या करण्यात आली आहे.महेश दिगंबर काकडे (वय, 18, रा. नक्षत्रवाडी ) असं खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी की कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोरच्या गल्लीत महेश काकडे (Mahesh Kakade) याचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांनी बघितले. यानंतर जखमी महेश काकडे याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी महेश काकडेला मृत (Died) घोषित केले.
नगर जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरी जुगार तेजीत,अनेक कुटुंब उद्ध्वस्त पोलिसांचे दुर्लक्ष
या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहिती नुसार ही हत्या दारूच्या वादातून घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कराडे हे करीत आहेत. यासंबंधी प्रत्यक्षदर्शी आणि मृताच्या कुटुंबाचीही चौकशी केली जाणार आहे.
हे पण पहा –Ahmednagar | निळवंडे धरणही ओव्हरफ्लो