आपल्या डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तलाठी पतीकडून खून

0 469

पुणे –   आपल्या डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय तिच्या डोक्यात हातोडा आणि चाकूने वार करून तलाठी पतीने हत्या केल्याची घटना पुणेमध्ये उघडीस आली आहे. डॉ. सरला विजय साळवे (वय 32, रा. बोहाडेवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून विजयकुमार साळवे असे फरार झालेल्या तलाठी पतीचे नाव आहे.सरला आणि विजयकुमार यांचा मागच्या दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाहाझाला होता.  (Murder by Talathi husband on suspicion of his doctor wife’s character)

डॉ. सरला या बीएएमएस असून, पुण्यातील नायडू रुग्णालयात नोकरीला होत्या. तर, आरोपी विजयकुमार हा तलाठी असून, जुन्नर येथे तो कार्यरत आहे. विजयकुमार आणि सरला या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेमविवाह झाला आहे. सरला या मूळच्या भंडारा येथील तर, विजयकुमार हा गोंदिया येथील आहे. दोघे मोशीतील बोहाडेवाडी येथे वास्तव्यास होते. विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.

पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीत अधिकार – उच्च न्यायालय

Related Posts
1 of 1,608

शनिवारी रात्री सरला झोपेत असताना विजयकुमारने तिच्या डोक्यात हातोड्याने वर्मी घाव घातला आणि चाकूने वार केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आरोपी विजयकुमार घटनेनंतर फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.(Murder by Talathi husband on suspicion of his doctor wife’s character)

हे पण पहा – भरपावसात निलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: