पोलीस शिपाई भरती परीक्षेत बाहेरून ब्ल्यूटूथद्वारे उत्तर मागवणारा मुन्नाभाईला अटक

0 321

 औरंगाबाद –  २०१९ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या पोलीस शिपाई भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया सध्या सुरू आहे. सध्या चालक शिपाई पदासाठी लेखी परीक्षा सुरु आहे . औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास सुरु असलेल्या परीक्षांच्या दरम्यान पोलिसांनी परीक्षेत ब्ल्यूटूथ, मायक्रो एयरफोनचा वापर करून बाहेरून उत्तरे मागवणाऱ्या एका परीक्षार्थींला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने पकडले आहे.

राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. हा मोबाईलला ब्ल्यूटूथच्या साह्याने जोडलेल्या मख्खी एअर फोनद्वारे प्रश्न बाहेर बसलेल्या सतिष राठोडला सांगून त्याच्याकडून उत्तरे मागवत होता.  हा प्रकरण एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, एस. बी. मांटे, दिनकर सोनगिरे, शिपाई पुरी, बनसोडे आणि सुवर्णा ढाकणे न्यू हायस्कुल माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयातील केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेले असता परीक्षार्थी राहुल राठोड हा मोबाईल, मास्टरकार्ड ब्लूटूथ कनेक्टर डिव्हाईस आणि ब्लूटुथ मख्खी एअरफोन बाळगताना आढळून आला.

हे पण पहा – पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Related Posts
1 of 1,487

तो ब्लूटूथ आणि  मख्खी एअरफोनच्या सहाय्याने प्रश्न बाहेर पाठवून साथिदार सतिष राठोड याच्याकडून उत्तरे मिळवत असल्याचे उघडकीस आले. त्याला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करत आहेत.

भारतीय संघात THALA IS BACK , बीसीसीआय कडून मोठी घोषणा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: