समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री, नांगरे पाटीलांनी दिला “हा”आदेश

0 455

नवी मुंबई –   ड्रग पार्टी प्रकरणाला आता संपूर्ण वेगळाच वळण मिळाले आहे. या कारवाईत पंच असलेला  प्रभाकर साईल (Prabhakar Sail) ने अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्यावर लाच खोरीचे आरोप लावल्याने संपूर्ण प्रकरणाला एक वेगळाच वळण प्राप्त झाला असून या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देखील एक मोठा पाऊल उचललं आहे. समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चार अधिकाऱ्यांची नेमकणूक केली आहे. यासंदर्भातील आदेश मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Nangre Patil) यांनी बुधवारी जारी केलेत. नांगरे पाटील यांच्या या आदेशानंतर आत मुंबई पोलीस स्वतंत्रपणे या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी करणार आहेत.(Mumbai Police’s entry in Sameer Wankhede case, Nangre Patil gave “this” order)

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या तपासाचा नेतृत्व अतिरिक्त पोलीस आयुक्त एसीपी दिलिप सावंत करणार आहे.  या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक व अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील असणार आहे.

या चारपैकी प्रभाकर साईलने केलेली तक्रार ही आर्यन खान प्रकरणातील आहे. प्रभाकर साईल हा या छाप्यातील साक्षीदार आहे. ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईलने केलाय. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईलने म्हटलंय.आपल्या जीवाला धोका असल्यानं एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईलने केलाय. कार्यालयात बसल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचं दिसतंय. काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला. त्यानंतर सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजर सोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली, असं साईलने सांगितलं.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Related Posts
1 of 1,603

बुधवारी दक्षता पथकाने चार तास समीर यांची चौकशी केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. वानखेडे यांच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’चे दक्षता पथक दिल्लीहून मुंबईत आले आहे. पथकाने वानखेडे यांची चौकशी केली. त्यापूर्वी ‘एनसीबी’च्या मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे व चित्रफिती या पथकाने ताब्यात घेतल्या. या प्रकरणी एनसीबी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी यांच्यासह के. पी गोसावी, प्रभाकर साईल यांचा ही जबाब नोंदविणार असल्याचे समजते. (Mumbai Police’s entry in Sameer Wankhede case, Nangre Patil gave “this” order)

राष्ट्रवादीचा भाजपाला दे धक्का ,भाजपचे २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: