नवनीत राणांच्या ‘त्या’ आरोपावर मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर; पाहा ‘हा’ व्हिडिओ

0 393
Mumbai Police's apologetic reply to Navneet Rana's 'that' allegation; Watch this video
 मुंबई –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पोलीस कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचा आरोप लावल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता या प्रकरणात नवीन व्हिडिओ समोर आल्याने पुन्हा एकदा नवनीत रांना चर्चेत आले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी लावलेल्या आरोपावर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा चहा पिताना दिसत आहे. यामुळे आता या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करत मुंबईत धडकलेल्या आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तसे पत्रच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले होते. पण यावर आता मुंबई आयुक्तांनी थेट पुराव्यासह उत्तर दिलं आहे.
Related Posts
1 of 2,357
पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ शेअर करत नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. ट्वीट शेअर करताना पोलिसांनी ‘Do we say anything more’ अशी कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा शेजारी बसले असून त्या चहा पिताना दिसत आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप कितपत खरे? यावर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: