Mukesh Ambani लंडनमध्ये होणार स्थायिक ? रिलायन्सने दिला “हा” स्पष्टीकरण

0 241
मुंबई –  आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती(The richest businessman in Asia) आणि संपूर्ण जगातील  सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये 11 व्या क्रमांकावर येणाऱ्या  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी  लंडनच्या स्टोक पार्कमध्ये  (London’s Stoke Park) 592 कोटी रुपये खर्च करुन 300 एकर जमीन खरेदी केली आहे.  त्यामुळे ते लवकरच आपल्या कुटूंबासह तिकडे  स्थायिक होणार असल्याचे चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मात्र यावर आता रिलायन्स इंडस्ट्रीजनं  (Reliance Industries) स्पष्टीकरण देण्यात आले आहे.  मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होण्याबाबतचे वृत्त निराधार असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.(Mukesh Ambani to settle in London? Reliance gave this explanation)

रिलायन्स इंडस्ट्रीजनं निवेदनात म्हटलं की, एका वृत्तपत्रात निराधार वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अंबानी कुटुंब लंडनच्या स्टोक पार्कमध्ये स्थायिक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अनिल अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबाची अशी कोणतीही योजना नाही. ते लंडन किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागात स्थायिक होण्याचा विचार करत नाहीत.

रिलायन्स ग्रुपची कंपनी RIIHL ने स्टोक पार्कमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. या हेरिटेज प्रॉपर्टीचा वापर गोल्फ आणि इतर खेळांसाठी केला जाईल. त्यासाठी स्थानिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. वेगाने वाढणारा ग्राहक व्यवसाय पाहता ही मालमत्ता संपादित करण्यात आली आहे. भारत ज्या संस्कृतीचे आयोजन करतो त्याला जागतिक दर्जाची ओळख द्यायची आहे.

भाऊबीजेच्या दिवशी भावाची 5 ते 6 वार करत निर्घृण हत्या……, आरोपी फरार

अंबानींचा लंडनमधला महल कसा आहे?

मुकेश अंबानी यांनी लंडनमधील बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क (Buckinghamshire, Stoke Park) या ठिकाणी 300 एकरची जागा विकत घेतली. या परिसरात एक ऐतिहासिक वास्तू असेल. मुकेश अंबानींनी 592 कोटी रुपये देऊन याची जमीन खरेदी केली. यात तब्बल 49 बेडरूम्स असतील. यात एक मिनी हॉस्पिटल असेल. तसंच यात सर्व सुसज्ज सोयी उपलब्ध असतील. ही वास्तू खुल्या वातावरणात आहे.ही वास्तू खूप जुनी आहे. 1908 सालापर्यंत ती खासगी मालमत्ता होती. त्यानंतर या वास्तूचे एका क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. यामध्ये अलिशान हॉटेल असून या वास्तूच्या आवारात एक गोल्फ क्लब सुद्धा आहे.(Mukesh Ambani to settle in London? Reliance gave this explanation)

हे पण पहा – किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: