जिल्ह्यात महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्याला फटका; लाखो रुपयांचे नुकसान

0 145
MSEDCL's Golthan administration hits farmers in the district; Loss of millions of rupees

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

अहमदनगर –  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात विजवितरणच्या तारांमुळे ऊसाला आग लागल्याने शेतकर्याचे (farmer) लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातील भास्करराव खताळ यांच्या शेतात असलेल्या वीज वितरणच्या डिपी आणि  लटकत असलेल्या तारांमुळे ऊसाला भिषण आग लागली.  यात जवळपास दहा एकरावरील ऊस जळून भस्मसात झालाय. विजवितरणला वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्याने भास्करराव यांना आर्थिक नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने उभे केलेले ऊसाचे पिक विजवितरणच्या गलथान कारभारामुळे डोळ्यादेखत भस्मसात झाले आहे. या झालेल्या नुकसानीला विजवितरण जबाबदार असून त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलनाचा पवार शेतकर्याने घेतला आहे.

Related Posts
1 of 2,326
तर दुसरीकडे  राज्यासह संपूर्ण देशात आता विजेचा संकट (Power crisis) वाढत आहे. आत देशातील तब्बल १० राज्यात विजेचा संकट निर्माण झाला आहे. याचा मुख्यकारण म्हणजे या राज्यात मोठ्या प्रमाणात कोळशाचा (Coal) तुटवडा निर्माण झाला आहे.  वाढती वीज मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे अनेक राज्यात भारनियम (load shedding) देखील सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील आता महावितरणने निर्णय घेत भारनियम सुरु केला आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना कडाक्याच्या उन्हात अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: