‘या’ मालिकेत मिस्टर 360 डीव्हिलियर्स करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन 

0

नवी मुंबई –  दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन आणि जगात मिस्टर ३६० म्हणून ओळखला जणारा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने वर्ल्ड कप २०१९ पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून  अचानक रिटायर होण्याची घोषणा केली होती. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला होता.

मात्र मागच्या काही दिवसांपासून त्याच्या आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची चर्चेने जोर धरला आहे . दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत भाष्य केला होते . तर स्वतः आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान डीव्हिलियर्सनंही याबाबतची इच्छा व्यक्त केली होती.

महिला कर्मचारीचा दारू पिऊन धिंगाणा , सोशल मीडियावर व्हायरल, पाहा हा व्हिडिओ

तर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) यांनी डीव्हिलियर्सच्या आंतररराष्टीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाबाबत एक मोठा विधान केला आहे.  वेस्ट इंडिज विरुद्ध जून महिन्यात होणाऱ्या टी-२० मालिकेत ए. बी डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Related Posts
1 of 42

दक्षिण आफ्रिकेची टीम 2 टेस्ट आणि 5 टी 20 मॅचच्या मालिकेसाठी जून महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे, अशी घोषणा स्मिथ यांनी केली. त्यावेळी त्यांनी डीव्हिलियर्स पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल असं मत व्यक्त केलं. डीव्हिलियर्ससह ख्रिस मॉरीस आणि इम्रान ताहीर देखील आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक अजून जाहीर होणे बाकी आहे. डीव्हिलियर्स, मॉरीस आणि ताहीरचं टीममध्ये पुनरागमन होईल, अशी आपल्याला आशा आहे, असं स्मिथनं सांगितलं. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटच्या संचालकांच्या या वक्तव्यामुळे डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाची आता केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी आहे, असं मानलं जात आहे.

आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती-  राजेश टोपे 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: