संसदेत Porn बघत होता खासदार; महिला खासदाराने पाहताच झालं असं काही ..

0 648
MP was watching porn in Parliament; Something happened when a woman MP saw it ..

 

दिल्ली –    जगभरातील संसदेत (Parliament) आप आपल्या देशाच्या विकासाठी नवीन नवीन कायदे निर्माण करण्यात येते तर कधी या कायद्यांवर चर्चेत होते तर कधी वाद मात्र कधी कधी याच संसदेत अशी घटना घडते ज्यामुळे सर्वसामान्य जनेतून संताप व्यक्त करण्यात येते अशीच एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना ब्रिटिश संसदेत घडली आहे. ब्रिटिश संसदेमध्ये (Britain) एका खासदारावर संसदेच्या आत पॉर्न फिल्म पाहण्याचा आरोप आहे. मात्र त्या खासदाराची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. (MP was watching porn in Parliament; Something happened when a woman MP saw it ..)

‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या संसदेतील एक खासदार (MP) आपल्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. त्यानंतर उपस्थित महिला खासदार संतप्त झाल्या. रिपोर्टनुसार, या घटनेनंतर महिला खासदाराने या प्रकरणाची तक्रार केली. इतकेच नाही तर इतर अनेक खासदारांनीही या प्रकरणावर तीव्र विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी एका महिला खासदाराने आरोपी खासदाराला खडसावलं आहे.

 

Related Posts
1 of 2,452

या प्रकरणाबाबत अनेक महिला खासदारांनी आवाज उठवला आहे. एका महिला खासदाराने सांगितले की, हे सर्व घडत असताना ती आरोपी खासदाराजवळ बसली होती. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र असे कृत्य करणारे खासदार कोण? त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

 

प्रकरणाचा तपास सुरू

या प्रकरणी कंझर्व्हेटिव्ह व्हीप ऑफिसचे विधानही समोर आले असून त्यानुसार ‘चीफ व्हिप (ख्रिस हीटन हॅरिस) या प्रकरणाची चौकशी करत आहेत. असे वागणे अजिबात सहन होत नाही. या प्रकरणाचा अहवाल येताच आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. (MP was watching porn in Parliament; Something happened when a woman MP saw it ..)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: