
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- आशिया खंडात नावाजलेल्या व सर्वात मोठ्या काष्टी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया चालू असुन विविध आरोप प्रत्यारोप चालू आहेत. दोन दिवसांपूर्वी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष कैलास पाचपुते यांनी आमदार बबनराव पाचपुते व खासदार सुजय विखे हे आमच्यासोबत असल्याचे वर्तमानपत्रातून सांगितले होते. यावर खासदार साहेबांनी आमदार पाचपुते यांच्याशी संवाद साधुन वृत्तपत्रातील बातमी विषयी सत्यता पडताळली. यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी खासदार सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांच्याशी चर्चा केली असता ही निव्वळ अफवा असून आम्ही दोघेही भाजपाचे जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कळवले,अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष नागवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.