खासदार छत्रपती संभाजीराजे कार्यकर्त्यांवर संतापले…… म्हणाले “मी जाऊ का?”

0 224
नांदेड –   राज्यात मराठा आरक्षणा (Maratha reservation) वरून महाविकास आघाडी(MVA) आणि भारतीय जनता (BJP) पक्षात आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje)  यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणावरून मूक आंदोलनाला सुरुवात  झाली असून आज नांदेडमधून सुरु होणाऱ्या या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.  ही गर्दी आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून संभाजीराजे त्यांच्यावर संतापले आहेत.  (MP Chhatrapati Sambhaji Raje got angry with the workers and said “Shall I go?”)

यावेळी बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की सध्या कोविडची परिस्थिती पाहता आपण एवढी गर्दी करणं खरं चुकीचं आहे. पण मी तुमच्या भावना समजू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुमच्याकडे मास्क असेल तर तो लावावा. नांदेडला कोरोनाचं प्रमाण कमी असलं तरी तुम्ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. ते बोलत असतानाच कार्यकर्ते गोंधळ करत होते, घोषणा देत होते. त्यामुळे “ओ बंद करा ना, कोणी बोलू नका’ असं म्हणत संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आँडिओ क्लिपमुळे खळबळ , दिला आत्महत्याचा इशारा

Related Posts
1 of 1,512

कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी मुळे संभाजीराजेंना फारसं बोलणं शक्य झालं नाही. ते म्हणाले, “हे खऱ्या अर्थाने मूक आंदोलन होतं. मूक आंदोलनाचा हेतूच हा होता की समाज बोललाय..” मात्र कार्यकर्त्यांच्या गोंधळाला कंटाळून ते म्हणाले, मी जाऊ का? त्यानंतर मात्र ते पुढे काही वेळ बोलले. ते म्हणाले, मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही समन्वयक बोललोय, आता सरकारने बोलावं म्हणून हे आंदोलन पुकारलं होतं. मात्र ही गर्दी पाहता लोकप्रतिनिधींना बोलायला मिळेल की नाही अशी शंका वाटतेय. पण मी त्यांना जास्तीत जास्त बोलू देण्याचा प्रयत्न करेन.(MP Chhatrapati Sambhaji Raje got angry with the workers and said “Shall I go?”)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: