खासदार विरोधात गुन्हा दाखल, हुंड्यासाठी छळवणूक केल्याचा आरोप

0 304

नवी दिल्ली – ओडिशा (Odisha)  राज्यात मागच्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणारी  बिजू जनता दला (Biju Janata Dal) च्या कटक लोकसभा  मतदार संघातून खासदार असलेल्या  भर्तृहरि महताब (Bhartruhari Mahtab) सह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात हुंड्यासाठी सुनेचा  छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MP charged with harassment for dowry)

Related Posts
1 of 1,512
खासदार आणि त्यांच्या कुटूंबा विरोधात महताब यांची 34 वर्षीय सून साक्षी यांनी भोपाळच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये IPC कलम 498 (विवाहित स्त्रीला गुन्हेगारी हेतूने फसवणे किंवा ताब्यात घेणे), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 34 (गुन्हेगारी कट) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम 3/4 अंतर्गत (हुंडा घेणे आणि देणे किंवा हुंडा घेणे आणि देणे) असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादीत म्हटले आहे कि लग्नात माझ्या कुटुंबियांनी खूप खर्च केला होता. आता माझ्यावर हुंड्यासाठी सासरचे लोकं छळ करत असल्याचं साक्षी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसंच साक्षी यांनी आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबाने 2016 मध्ये तिच्या सासऱ्यांना हुंडा म्हणून 1.5 कोटी दिले, पण ते अधिक पैशांची मागणी करत होते.

जिल्ह्यात जमीनीच्या वादातून युवकांनी केली आत्महत्या.., गुन्हा दाखल

भोपाळच्या महादेव परिसरात राहणारी तक्रारादर सून साक्षी यांचं लग्न ओडिशाच्या बीजू जनता दलाच्या खासदाराचा मुलगा लोकरंजन यांच्यासोबत 2016 ला दिल्लीत झालं.(MP charged with harassment for dowry)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: