दोन मोटारसायकल चोर पकडले; राहुरी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी DNA मराठी टीम
राहुरी – राहुरी पोलीस (Rahuri police)पथकाने मोटरसायकल (Motorcycle) चोरणाऱ्या दोघाजणांना मोठ्या शिताफीने अटक करून गजाआड केले. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. (Motorcycle thief caught; Rahuri police action)
Related Posts
सिद्धार्थ उत्तम जाधव (वय २५ वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी) या तरूणाने त्याची मोटारसायकल खंडाबे खुर्द गावातील मराठी शाळेसमोर लावली. ते माघारी येईपर्यंत त्यांची मोटारसायकल चोरीला गेली. या दरम्यान दोन तरूण मोटारसायकल जवळ संशयास्पद चकरा मारत असल्याची माहिती सिद्धार्थ जाधव याला मिळाली. त्याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी म्हणून सागर बाबासाहेब दळवी रा. नान्नज, पारेगाव ता. संगमनेर व शुभम बाळू माळी रा. खडांबे खुर्द ता. राहुरी या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास हवालदार साईनाथ टेमकर हे करीत होते.
पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा, पोलीस हवालदार साईनाथ टेमकर, वाल्मिक पारधी, सी. एन. बऱ्हाटे, पोलीस शिपाई जयदीप बडे, सुशांत दिवटे आदी पोलीस पथकाने छापा टाकून दोन्ही आरोपींच्या क्या आवळून ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेली मोटारसायकल कोठे ठेवली? याची माहिती दिली असून पोलिसांनी दोन मोटरसायकली हस्तगत केले आहे. (Motorcycle thief caught; Rahuri police action)