
जावयाकडून सासूवर हल्ला….
नगर : जावायाने सासूवर चाकूने हल्ला केल्याची घटना नगर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात रविवारी पहाटे घडली. आशाबाई सुखदेव मोरे (वय 45 रा. कोल्हेवाडी) असे जखमी सासूचे नाव आहे. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जावायासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत मच्छिंद्र माळी, मच्छिंद्र माळी (पूर्ण नाव माहिती नाही) व संगीता मच्छिंद्र माळी (सर्व रा. लोणी सय्यदमीर ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भरत व त्याची पत्नी दीपाली यांच्यात वाद झाल्याने दीपाली सासरी कोल्हेवाडी येथे राहत होती. रविवारी पहाटे अडीच वाजता फिर्यादी घरी झोपलेल्या असताना तेथे भरत, मच्छिंद्र व संगीता हे तिघे आले. भरत हा फिर्यादीला म्हणाला,‘मला माझी बायको दीपालीस मुलांसह घेऊन जायचे आहे’, त्यावर फिर्यादी त्याला म्हणाल्या,‘तु दीपालीस मारहाण करतो, मी तिला पाठविणार नाही’. असे म्हणताच संगीताने शिवागाळ केली व मच्छिंद्रने दीपालीला मारहाण केली.
ahmednagar crime: दारुच्या नशेतूनच पिंपळगाव रोठात हत्याकांड…
फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता भरतने त्याच्याकडील चाकूने त्यांच्या मानेवर व हातावर वार करून जखमी केले. मच्छिंद्रने फिर्यादीची मुलगी दीपाली व मुलगा सोमनाथ यांना काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरडा ऐकून शेजारचे लोेक जमा झाले यानंतर मारहाण करणारे तिघे पळून गेले. गुन्हा दाखल झाला असून पोलीस अंमलदार बी. व्ही. सोनवणे करीत आहेत.