मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र लंपास.., गुन्हा दाखल

0 218

नवी मुंबई –    अंबरनाथ (Ambernath) येथे मॉर्निंग वॉक (Morning walk) ला निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास (Robbery) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) वरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपस करत आहे. शांती नायडू असं मंगळसूत्र चोरी झालेल्या महिलेचं नाव आहे. (Morning Walk Woman’s Mangalsutra Lampas .., Crime filed)

मिळालेल्या माहितीनुसार  शांती या आपल्या मैत्रिणीसोबत सकाळी सातच्या सुमारास भेंडीपाडा परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या असता त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचं मंगळसूत्र खेचलं आणि तिथून पळून गेले. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु आहे.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप लावत , शर्लिन चोप्राने दाखल केला FIR

तर दुसरीकडे नवी मुंबई पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केले आहे. या चोरट्यांनी तब्बल 18 गुन्हे केल्याचा आरोप पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचे सोने जप्त केले आहेत.

Related Posts
1 of 1,463

पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करुन सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे आरोपींना बेड्या ठोकल्याने तब्बल 18 चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून 4 लाख 35 हजारांचे सोने तसेच 1 लाख किंमतीची दुचाकी असे एकूण 5 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी केली आहे. तर दुसऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Morning Walk Woman’s Mangalsutra Lampas .., Crime filed)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: