करोनामुळे जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक वाहनचालक बेरोजगार

0 154

श्रीगोंदा  :  करोनामुळे शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस मालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दीड वर्षाहून अधिक काळ शालेय बस नुसत्याच उभ्या आहेत.  50 पेक्षा अधिक वाहनचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. काहींनी वाहन खरेदीसाठी काढलेल्या कर्जाला कं टाळून वाहने विकली. काहींनी भाजीपाला विकण्यापासून पडेल ते काम करण्यास सुरुवात के ली आहे.

करोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणे सुरू आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन विभाग, राजकीय संघटनांच्या वाहतूक शाखा यांच्या प्रयत्नांमुळे वाहन परवाने देण्याला गती प्राप्त झाली होती. यामुळे विद्यार्थी वाहतूक व्यवसाय म्हणून शिक्षित लोकही यामध्ये उतरले. दहा आसनी वाहने खरेदी करण्यात आली. व्यवसाय सुरळीत सुरू असताना अचानक करोनाचा शिरकाव झाला. शाळा बंद होताच विद्यार्थी वाहतूक बंद झाली. काही बसमालक गाड्या धुणे, भाजीपाला विकणे, एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणे आदी कामे करत आहेत. वाहनचालकांनीही पडेल ते काम करत पोटाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

सादिक बिराजदार मृत्यू प्रकरण सीआयडीकडे ?

Related Posts
1 of 1,608

करोनाच्या काळात सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. शालेय बस मालक,चालक, सहायक यांचे दीड ते दोन वर्षांत प्रचंड नुकसान झाले आहे.  शासनाने शालेय बस चालक-मालक यांच्या बाबतीतही धोरणात्मक निर्णय जाहीर करावा, वर्षभरात घेण्यात येणारे वेगवेगळे शुल्क रद्द करावे, विमा वर्ग करण्यात यावा, आदी मागण्या महाराष्ट वाहतूक सेनेनेे के ल्या आहेत. दोन वर्षांपासून शाले बस बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. बँकेचे हफ्ते फेडणे अवघड झाले आहे. खासगी वित्त संस्थेचे हप्ते न भरल्यास भरमसाट दंड आकारला जात आहे. हॉटेलमध्ये काम करून गाडीचे हप्ते भरत असल्याची अगतिकता बस मालक यांनी व्यक्त के ली.  सगळे जगणेच अवघड झाले आहे. शासन मदत करत नाही आणि बँके चे हप्ते जगू देत नाही. चक्र वाढ व्याज सुरू असल्याने मजुरी आणि शेतीकाम करून गाडीचे हप्ते फेडत असल्याचे व्हॅन चालक भाऊसाहेब होरेे यांनी सांगितले. अतिशय वाईट परिस्थिती आहे. उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. इतर मालवाहतूक गाडीस बदली चालक म्हणून काम मिळाले तर वाहन चालवतो, अन्यथा रोजंदारीचे काम करावे लागत असल्याचे त्यानिि सांगितले.

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: