येणाऱ्या पाच दिवसात राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, “या” जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

0 380

नवी मुंबई –    राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूननं (Monsoon) राज्यात दिमाखात आगमन केलं आहे. मागच्या आठवड्यापासून राज्यातील जवळपास बहुतेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागच्या चोवीस तासात अहमदनगरसह मुंबई , पुणे या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर आता येणाऱ्या दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD Alerts) वर्तवण्यात आली आहे.

येणाऱ्या चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता असून त्यामुळे येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मागील 2-3 दिवसापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर काल मराठवाड्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत देखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांची चिंता कमी झाल्याची पाहायला मिळत आहे.

मित्रानेच केला दारूच्या नशेत मित्राचा गळा चिरून खून , आरोपीला अटक

Related Posts
1 of 1,641

पुढील पाच दिवसात कोकणात सर्वत्र पावसाची स्थिती आहे. प्रामुख्यानं उत्तर कोकणात धुव्वाधार पावसाची बॅटींग होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कोकणात अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. उद्या मुंबई आणि पुण्यासह अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्या कोकणात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस पडू शकतो.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: