Monkeypox लैंगिक संबंधांमुळे पसरतोय?; आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा,म्हणाले ..

0 469
Monkeypox spread by sex ?; A warning from a health expert, he said.
 
मुंबई –  एकीकडे जगात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. अनेक देशांनी आता कोरोना काळात लागू  केलेल्या अनेक निर्बंधला शिथिलता देखील दिली आहे.  तर आता दुसरीकडे पुन्हा एकदा नवीन विषाणू डोकं वर करत आहे. मंकीपॉक्स (Monkeypox) असं या संसर्गाचं नाव आहे. जगातील अनेक देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण समोर आले आहेत.

 

हा आजार कसा पसरतोय, याची चिंता तज्ज्ञांना सतावतेय. आता ‘या’ आजारावर डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला आहे. दरम्यान हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र या प्राणघातक आजाराच्या प्रसारासाठी लैंगिक संबंध हे एक मोठं कारण असू शकतं.  तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ‘मंकीपॉक्स’ ग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवलात तर तुम्हाला या संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे.

 

Related Posts
1 of 2,448

मंकीपॉक्सची लक्षणं

  • स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजूणं
  • रुग्णाला खूप थकवा जाणवणं
  • लिम्फ नोड्स सुजणं
  • तीव्र ताप आणि न्यूमोनियाची लक्षणं
  • शरीरावर गडद लाल ठिपके दिसणं
  • डोकेदुखी

तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, ‘मंकीपॉक्स’ हा कांजिण्याप्रमाणे एक पॉक्स आहे. परंतु अजूनपर्यंत या संसर्गाच्या प्रसाराचं नेमकं कारण आणि उपचार सापडलेले नाहीत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: