चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले?; टेन्शन नाही ‘या’ ट्रिकने एका झटक्यात मिळणार पैसे

0 342
Money transferred to another's account by mistake ?; No tension, this trick will get you money in one fell swoop

 

मुंबई –  तुम्ही चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (Money transfer) केले असल्यास, तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. आजकाल मोबाईल बँकिंगमध्ये अनेक वेळा चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. अशा परिस्थितीत कधी-कधी बँकिंग फसवणूकही होते. जर तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर ही रक्कम तुम्हाला परत कशी मिळेल यांची माहिती घ्या.

अशी रक्कम परत मिळेल
चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळताच, तत्काळ तुमच्या बँकेला कळवा.
याशिवाय कस्टमर केअरला फोन करून संपूर्ण माहिती द्या.
जर बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर त्यात या चुकीने झालेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या.
ट्रान्झॅक्शनची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात चुकून पैसे हस्तांतरित केले गेले आहेत ते तपशील द्या.

 

Related Posts
1 of 2,357

किती वेळ लागू शकतो
तसे, या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्हाला तुमचे पैसे त्वरित परत मिळू शकतात.
काही वेळा अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2 महिने लागू शकतात.
तुम्ही तुमच्या बँकेतून जाणून घेऊ शकता की, कोणत्या शहरातील कोणत्या शाखेत पैसे कोणत्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत.
तुम्ही शाखेशी बोलून पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकता.
यानंतर बँक त्या व्यक्तीची माहिती बँकेला देईल ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत.
यानंतर बँक त्या व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर केलेले पैसे परत करण्याची परवानगी मागते.

 

दुसरी पद्धत अवलंबू शकते
याशिवाय तुम्ही कायद्याचाही आधार घेऊ शकता. ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले, त्याने ते परत करण्यास नकार दिला, तर त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला जाऊ शकतो. पैसे परत न केल्यास, हा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या उल्लंघनाच्या संदर्भात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आरबीआयने बँकांना सूचना देखील दिल्या आहेत की जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर कारवाई करावी लागेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: