
नगर ः घरमालकाच्या कुटुंबाकडून महिलेचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली. सावेडीतील एका उपनगरामध्ये गुरूवारी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. विवाहित महिलेच्या कुटुंबाने तात्याबा सांगळे, जगदीश सांगळे यांच्याकडून सावेडी उपनगरातील एक घर खरेदीसाठी साठेखत केले होते.
श्रीरामपूर बाजार समितीत दुरंगी लढत…
या साठेखताची मुदत २१ एप्रिलला संपत होती. त्यापूर्वी तात्याबा सांगळे, जगदिश तात्याबा सांगळे, सुनील तात्याबा सांगळे, रेश्मा जगदिश सांगळे व शुभम जगदीश सांगळे हे संबंधित महिलेच्या घरी दुपारी तीन वाजता गेले. साठेखताच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यावर जगदिश सांगळे यांनी डावा हात धरून ओढले. तात्याबा सांगळे यांनी चापटीने मारहाण केली.
. त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सांगळे कुटुंबाविरूद्ध मारहाण करणे, विनयभंग करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.