अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलीस पाटलावर गुन्‍हा दाखल

0 202
Inquiry order of Director General of Police in Gutkha case

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

भंडारा – १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा (Minor girl) विनयभंग केल्याप्रकरणी साकोली तालुक्यातील चिंगी येथील पोलीस पाटील संजय रामकृष्ण रामटेके (वय ३५) याच्‍यावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार चिंगी येथे शनिवारी रात्री बचत गटाची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान एका १३ वर्षीय मुलीला पोलीस पाटलाकडून स्टॅम्प घेऊन ये, म्हणून पाठविण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटील संजय रामटेके याने मुलीचा विनयभंग केला.

Related Posts
1 of 2,326

मुलगी रडत घरी आली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्या मुलीने सर्व घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी साकोली पोलीस स्टेशन गाठले. व त्यांनी या घटनेची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी पोलीस पाटील संजय रामटेके याच्यावर कलम ३५४ अ, पोस्कोनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: