मोकाटेचा उच्च न्यायालयातही अटकपुर्व जामीन फेटाळला; अडचणीत वाढ

अहमदनगर – मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटे (Govind Mokate) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपिठातही नुकताच फेटाळण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्याने मोकाटेचा जामीन औरंगाबाद खंडपीठात ठेवण्यात आला होता. ते देखील फेटाळण्यात आल्याने मोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आलेले आहे. आरोपी मोकाटे फरार असून, त्याच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवण्यात आला होता.